कल्याण : केजीच्या प्रवेशासाठी हजारो रुपयांची डोनेशन घेणाऱ्या खासगी शाळांविरोधात कल्याणमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी आज (बुधवार) मोर्चा काढला होता. कल्याणमधील खासगी शाळा केजीतल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये मनमानी करत असल्याचा आरोप डेमोक्रेटिक यूथ फेडरेशनचा आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला होता.
राईट टू एज्युकेशन अर्थात शिक्षण हक्काच्या कायद्यांतर्गत समाजातील वंचित घटक आणि गरीब विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांनी 25 टक्के प्रवेश देणं बंधनकारक आहे. असं असूनही बहुतांश खासगी शाळा पहिलीपासून आरटीईअंतर्गत प्रवेश देतात आणि केजीतल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी फी आणि डोनेशनच्या नावे हजारोनं रक्कम उकळतात.
महापालिकेचा शिक्षण विभागही शाळेकडून होत असलेल्या फसवणुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही डेमोक्रेटिक यूथ फेडरेशनच्या वतीनं करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये केजी प्रवेशाच्या नावानं हजारोंची लूट, महापालिकेवर मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jan 2018 03:38 PM (IST)
केजीच्या प्रवेशासाठी हजारो रुपयांची डोनेशन घेणाऱ्या खासगी शाळांविरोधात कल्याणमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी आज (बुधवार) मोर्चा काढला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -