मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बर मार्गाचा लवकरच गोरेगावपर्यंत विस्तार होणार आहे. त्यामुळे गोरेगाववरुन लोकल न बदलता थेट तुम्हाला पनवेलपर्यंत जाता येणार आहे.
पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्या गोरेगावहून सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना आता थेट पनवेलला जाणं सोपं होणार आहे. गोरेगाव, राम मंदिर रोड, जोगेश्वरी स्थानकांवरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
सध्या सीएसएमटी ते अंधेरी मार्गावर 91 फेऱ्या चालवल्या जात आहेत. हार्बर मार्गावर यापूर्वी अंधेरीपुढे कोणतीही मार्गिका उपलब्ध नव्हती. सध्या अंधेरीहून वडाळामार्गे लोकल पनवेलपर्यंत जाते.
मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) गोरेगावपर्यंत हार्बर लोकलच्या सेवेचा विस्तार करण्याचं काम पूर्ण केलं जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मार्ग सेवेत येण्यासाठी मुख्य सुरक्षा आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. त्या प्रक्रियेसाठीही महामंडळातर्फे लवकरच पुढाकार घेतला जाणार आहे.
चर्चगेट ते अंधेरीमध्ये लोकलच्या 65 फेऱ्या चालत असून, त्या फेऱ्यांचा विस्तारही शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेने 50 टक्के फेऱ्या थेट गोरेगावपर्यंत नेण्याची तयारी दर्शवली आहे. गोरेगाव विस्ताराचा हा अंतिम टप्पा लवकरच कार्यान्वित होणार असून, याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
गोरेगावहून आता थेट पनवेल गाठा, लवकरच लोकल सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2017 08:39 AM (IST)
पश्चिम उपनगरातील प्रवाशांना आता थेट पनवेलला जाणं सोपं होणार आहे. गोरेगाव, राम मंदिर रोड, जोगेश्वरी स्थानकांवरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -