मुंबई : अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते ठाणे डाऊन धिम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
या मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वे मार्गावरील सर्व धिम्या लोकल माटुंगा ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकलना सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे स्थानकापासून त्या डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.
तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीकडे जाणाऱ्या, तसेच पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे मेगाब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2017 07:46 AM (IST)
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते ठाणे डाऊन धिम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -