नवी दिल्ली : आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांपर्यंत कपात करुन 5.40 टक्के केला आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांच्या अपेक्षा यामुळे वाढल्या आहेत. या निर्णयामुळे कर्जावरील हफ्ते स्वस्त होणार आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीने बुधवारी रेपो दरात 0.35 टक्कांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर 5.40 टक्के इतका झाला आणि रिव्हर्स रेपो दर 5.15 टक्के झाला आहे. आधी हा रेपो दर 5.75 टक्के होता.
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीतील दोन सदस्य चेतन घटे आणि पामी दुआ, 0.35 टक्के कपातीविरोधात होते. 0.25 टक्के कपात व्हावी असं त्यांना वाटत होतं. मात्र इतर सदस्य विंद्र ढोलकिया, देवब्रत पात्रा, बिभु प्रसाद आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या कपातीचं समर्थन केलं. शक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी आल्यानंतर सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.