मुंबई : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आणि रेल्वेच्या तिनही मार्गावरच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो आहे.   मध्य रेल्वेवर सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास 20 मिनीट उशिराने असल्याची माहिती मिळते आहे. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक उशीराने होत असल्याचं कळतं आहे.   तर दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे नाहतूक उशीराने होत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या मोसमात मुंबईच्या लाईफलाईनवर ही वेळ येणार असेल तर पुढचा पाऊस लोकलसेवा कसा झेलणार हा मोठा प्रश्नचं आहे.