मोपलवारांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती, मुख्यमंत्र्यांचे आदेश
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2017 10:07 AM (IST)
माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ या त्रिसदस्यी चौकशी समितीचे अध्यक्ष असणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ आणि पोलिस उपायुक्त (इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग) समितीचे सदस्य असतील.
मुंबई : कथित ऑडियो क्लिपमुळे दलालीचे आरोप झालेल्या राधेश्याम मोपलवार यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात आदेश देत संबंधित समितीला एक महिन्यात चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ या त्रिसदस्यी चौकशी समितीचे अध्यक्ष असणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ आणि पोलिस उपायुक्त (इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग) समितीचे सदस्य असतील. रविवारी मुख्यमंत्र्यांनी या समितीला महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.