ठाणे : मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर शहापूर तालुक्यातील सर्व धरणांचे दरवाजे उघडले आहेत.


मुंबई महापालिकेची धरणं :

  • तानसा - 5 दरवाजे उघडले

  • मोडक सागर - 2 दरवाजे उघडले

  • मध्य वैतरणा - 3 दरवाजे उघडले


राज्य सरकारचं धरण :

  • भातसा धरण - 5 दरवाजे दीड मीटरने उघडले


यापैकी मुंबई महापालिकेच्या धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे मानवी वस्तीला धोका नाही. मात्र, भातसा धरणातून विसर्ग सुरू राहिल्यास शहापूर तालुक्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, नदी किनारे, पूल आणि आवश्यक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांनी याबाबत माहिती दिली.