मुंबई : पालघर जिल्ह्यातील 338 शिक्षकांनी आपल्या प्रस्तावित बदल्यांविरोधात मंत्रालयावर मोर्चा काढला. ऑनलाईन बदली प्रक्रियेत आपल्यावर अन्याय होत असल्याचा दावा या शिक्षकांनी केला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आझाद मैदानावरील आंदोलक शिक्षकांची भेट घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, असं आश्वासन दिलं.
न्याय न मिळाल्यास मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला. विनोद तावडे यांनी स्वत: आझाद मैदानात जाऊन या शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलं. शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही, तसंच प्रत्येक शिक्षकाला न्याय मिळेल, असं आश्वासन यावेळी आंदोलक शिक्षकांना दिलं.
पालघर जिल्हा परिषदेच्या चुकीच्या धोरणांमुळे 338 शिक्षकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेत 15 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत पालघर-ठाणे विकल्प समायोजनाने ठाण्याकडे जाणाऱ्या 114 शिक्षकांना हे सत्र संपताच म्हणजे अवघ्या दोन महिन्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. जिल्हा स्तरावरुन तात्काळ कार्यमुक्तीची प्रक्रिया करण्यास सांगिण्यात आलं.
संबंधित 114 शिक्षकांना जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतून वगळून त्यांच्या 114 जागा इतर शिक्षकांना उपलब्ध करुन देणं गरजेचं होतं. मात्र त्यांनाही फॉर्म भरण्यास सांगितल्याने इतर अनेक शिक्षकांनाही फटका बसला आहे.
विस्थापित शिक्षकांची संख्या वाढली असून ज्या तालुक्यातून अधिक संख्येने शिक्षक विस्थापित झाले आहेत, त्याच तालुक्यात हे विकल्पाचे शिक्षक अधिक संख्येने कार्यरत आहेत. जर विकल्पाच्या शिक्षकांना लगेच कार्यमुक्त केलं, तर विस्थापित शिक्षकांची संख्या 50 टक्क्यांहून खाली येईल.
पालघरमधील 338 शिक्षकांचं बदलीविरोधात आझाद मैदानावर आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Feb 2019 12:05 AM (IST)
विनोद तावडे यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलक शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलं. शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही, तसंच प्रत्येक शिक्षकाला न्याय मिळेल, असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -