मुंबई : संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सिद्धिविनायक न्यासाकडून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा जाहीर लिलाव करण्यात आला. लिलावासाठी ठेवलेल्या अलंकारांची किंमत साधारण 1 कोटी 10 लाखांच्या घरात आहे.

 
सोन्याचे सुंदर आणि रेखीव मुकुट, हार, अंगठ्या, कडे, नाणे, बिस्कीट अशा एकूण चारशे अकरा अलंकार लिलावासाठी ठेवण्यात आले होते. बाप्पांचा प्रसाद समजून हे दागिने विकत घ्यायला भक्तांना ही चांगलीच गर्दी केली होती.

 
लिलावासाठी ठेवलेल्या साडेतीन किलोच्या सोन्याची किंमत साधारण 1 कोटी 10 लाखांच्या घरात असल्याचं न्यासाकडून सांगितलं जात आहे. सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत हा जाहीर लिलाव सिद्धिविनायक मंदिरात झाला.