मुंबई : राज्यातील शिक्षणसम्राटांना राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे. यावर्षीपासून ‘नीट’च्या गुणवत्तेनुसार राज्यात सामूहिक प्रवेश प्रक्रिया होणार आहे. राज्य सरकारने सामूहिक प्रवेश प्रक्रिया लागू केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत सामूहिक प्रवेश प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘नीट’च्या गुणवत्तेनुसारच प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थी आपल्या पसंतीच्या कॉलेजचे पर्याय देऊ शकतात. विशेष म्हणजे यावर्षीपासूनच या पद्धतीने प्रवेश होणार आहेत.
दरम्यान, राज्यातील अभिमत विद्यापीठांनी प्रवेशासाठी जाहिरात काढली होती. मात्र, अभिमत विद्यापीठं अशाप्रकारे परस्पर प्रवेश देऊ शकत नाहीत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व प्रवेश ‘नीट’च्या गुणवत्तेनुसारच होतील.