मुंबई : गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 38 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने शनिवारी या गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आरक्षित तिकीट मिळण्यास मदत होणार आहे.

गणेशात्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी 142 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र त्यानंतरही अनेक प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी जादा फेऱ्यांची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने 38 विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या 180 वर पोहोचली आहे.

 

कोणत्या मार्गावर गाड्या?

लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी

करमाळी ते पनवेल

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी

 

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी स्पेशल ट्रेनच्या 30 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

ही स्पेशल ट्रेन 2 ते 21 सप्टेंबर दरम्यान आठवड्यातील पाच दिवस (सोमवार आणि गुरुवार वगळता) धावणार आहे.

या स्पेशल ट्रेनचे आरक्षण 22 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.