अंबरनाथमधील 12 रासायनिक कंपन्या बंद करण्याचे आदेश
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2017 12:07 AM (IST)
अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीतल्या 12 रासायनिक कंपन्या बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिले आहेत. काही दिवसांपूर्वी एमआयडीसीला लागून असलेल्या चिखलोली आणि जीआयपी धरण परिसरात रासायनिक कचरा टाकला जात असल्याचा प्रकार एबीपी माझानं समोर आणला होता. त्यानंतर प्रदूषण मंडळानं पाहणी करत 12 कंपन्यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम बंद करा. अशा नोटीसा या कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. यात गेटझ फार्मा, रुबिकॉन, वॉरकेम, फुक्स लुब्रिकंट या बड्या कंपन्यांसह पारले बिस्किटांचं उत्पादन करणाऱ्या बंटी फूडसचाही समावेश आहे.