मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं आहे. ‘उद्योगपती तुपाशी शेतकरी उपाशी, ‘गाजरवाल्या सरकारचा धिक्कार असो’, ‘मोदी दौऱ्यावर शेतकरी फासावर’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्याचसोबत परिचारकांची बडतर्फी झालीच पाहिजे अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, दिवाकर रावते पायऱ्यांवरून जात असताना ‘कुठे गेले कुठे गेले, राजीनामे कुठे गेले.’ अशा घोषणा करत विरोधकांनी शिवसनेला डिवचलं आहे.
दुसरीकडे आमदार परिचारकांची आमदारकी रद्द करण्यात यावी यासाठीही घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विधानपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीय आमदारांनी केली.
संबंधित बातम्या:
परिचारकांना बडतर्फ करा, अन्यथा सभागृह चालूच देणार नाही : विरोधक
विधानभवनाबाहेर स्वाभिमानीचं आंदोलन, राजू शेट्टी ताब्यात