नवी मुंबई : डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत बलात्काराचा प्रकार केल्याचा गुन्हा पनवेल मधील कोरोना सेंटरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे एकचं खळबळ उडाली आहे. पनवेल महानगर पालिकेकडून शहराबाहेर असलेल्या इमारती मधील कोरोना सेंटरमध्ये ही घटना घडली. एकाच इमारतीत पुरुष आणि स्त्रीयांना ठेवण्यात आल्याने सदरची घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या बाजूला खाजगी बिल्डरांनी उभ्या केलेल्या गृहप्रकल्पात पनवेल महानगरपालिका आणि नवीमुंबई महानगपालिकेने कोरोना सेंटर बनविले आहे. या सेंटरमध्ये नवी मुंबई मनपाकडून फक्त पुरूषांना अलगिकरणात ठेवले जाते. तर पनवेल महानगरपालिकेकडून या ठिकाणी महिला आणि पुरुष दोघांना अलगिकरणात ठेवण्यात येते. बलात्काराचा प्रकार पनवेल महानगर पालिकेने बनविलेल्या कोरोना सेंटरमध्ये घडला आहे. पनवेल मनपाने अलगिकरणात ठेवलेल्या युवकाने हे कृत्य केले आहे. अलगिकरणात इमारती मधील दुसऱ्या मजल्यावर आरोपी युवकाला ठेवले होते. तर पीडित महिला सहाव्या मजल्यावरील अलगिकरण रूममध्ये होती.
मुंबईतील 95 टक्के सलून आरोग्य परवान्याविना
एकाच इमारतीत पुरुष आणि स्त्रीयांना ठेवण्यात आल्याने घटना घडली
युवकाने आपण डॉक्टर असल्याचे सांगत पीडित महिलेच्या रुममध्ये प्रवेश केला होता. महिलेला काही त्रास होतोय का? असे विचारले असता आपले अंग दुखत असल्याचे महिलेने सांगितले. यावेळी कोरोनाचे रिपोर्ट बघून मसाज करावा लागेल असे सांगत महिलेच्या अंगावरील वस्त्र काढण्यात आले. यानंतर आरोपी युवकाने गैरकृत्य केल्याने पीडित महिलेने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग आणि बलात्काराचे कलम आरोपी युवकाच्या विरोधात लावण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान एकाच इमारतीत पुरुष आणि स्त्रीयांना ठेवण्यात आल्याने सदरची घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला यांना वेगवेगळ्या इमारतीमध्ये ठेवून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.
Mumbai Local | लोकलने प्रवास करताय? लोकलमधून प्रवासासाठी आता क्यु-आर’ कोडचा ई-पास बंधनकारक