मुंबई : तुम्ही जर ऑनलाईन एखादी वेबसिरीज किंवा चित्रपट फ्री पाहत असाल तर आधी ही बातमी पाहा. महाराष्ट्र सायबर सेलने अश्या काही चित्रपट आणि वेब सीरीजची नावं दिली आहेत. ज्यांचा वापर करुन सायबर फ्रॉड तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस टाकून तुमच्यावर सायबर अॅटक करतात. लॉकडाऊनच्या काळात काही फ्री वेबसाईट वर प्रसिद्ध चित्रपट आणि वेब सीरीज फ्री मध्ये दाखवण्यात येत असल्याचं म्हटलं जातं. जेव्हा एक व्यक्ती या साईटवर क्लिक करते तेव्हा एक MALWARE तुमच्या मोबाइल, कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करुन तुमचा सगळा डेटा हॅक करतो आणि त्याचा वापर करुन भामटे नागरिकांना त्रास देतात, खंडणी मागतात. सायबर सेलने अश्या चित्रपट आणि वेब सीरीजची नावं जाहीर केली आहेत.

लॉकडाऊन दरम्यान देशातील कोट्यवधी लोक ऑनलाइन चित्रपट किंवा वेब मालिका पाहत आहेत. अशा परिस्थितीत सायबर फ्रॉडने लोकांच्या याच सवईला फसवण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. खरं तर, देशात असे बरेच लोक आहेत जे कायदेशीर ओटीटी प्लॅटफॉर्मची सदस्यता घेत नाहीत आणि इंटरनेटवर बेकायदेशीरपणे चित्रपट किंवा वेब मालिका पाहतात. असे करणे धोकादायक आहे कारण हीच सवय आपल्याला अडचणीत आणू शकते.
जेव्हा तुम्ही बेकायदेशीर वेबसाइटवर चित्रपट किंवा वेब मालिका पाहायला जाता. तेव्हा ही साइट उघडताच मालवेयर (व्हायरस) आपल्या मोबाइल किंवा संगणकात जातो. हा मालवेयर तुमचे पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती चोरतो. डेटा चोरल्यानंतर, तुमच्या त्याच वैयक्तिक माहितीला सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं आणि तुमच्याकडून पैसे वसूल केले जातात.

महाराष्ट्र सायबर सेलला अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचं कळतंय. महाराष्ट्र सायबर सेलचे एसपी सचिन पांडकर यांनी एबीपी माझा दिलेल्या माहितीनुसार ‘महाराष्ट्र सायबर सेलच्या टेक्निकल टीमच्या संशोधन पथकाला असे चित्रपट, वेबसाइट्स, टीव्ही शोची नावे सापडली, ज्यांच्या नावाचा वापर करुन पायरेटेड वेबसाइटवर लोकांची फसवणूक केली जात आहे’
सायबर सेल ने 10 लोकप्रिय वेब मालिका आणि 10 चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे, जी भारतात सर्वांत जास्त पाहिली जात आहेत किंवा बेकायदेशीरपणे पाहण्यासाठी इंटरनेटवर सर्च केल्या जात आहेत. या लोकप्रियतेमुळे या चित्रपटांची व वेब सीरिजची नावे वापरुन सायबर फ्रॉड लोकांची फसवणूक करीत आहे.

टॉप 10 वेब सीरीज ज्यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक होत आहे.

  • DELHI CRIME

  • BROOKLYAN NINE-nine

  • PANCHAYAT

  • AKOORI

  • FAUDA

  • GHOUL

  • MINDHUNTER

  • NARCOS

  • DEVLOK

  • LOST


 

टॉप 10 चित्रपट, ज्यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक होत आहे.

  • MARDANI 2

  • ZOOTOPIA

  • JAWANI JANEMAN

  • CHHAPAK

  • LOVE AAJ KAL

  • INCEPTION BAHUBALI

  • RAJNIGANDHA

  • GULLY BOY

  • BALA


आता ही फसवणूक कशी टाळायची?

  • तुम्ही एखादा चित्रपट, वेब मालिका अज्ञात वेबसाइटवर पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर चित्रपट सुरू होण्यापूर्वी हॅकर एक प्रोग्रॅम चालवतातस हा प्रोग्राम चालवण्यास तुम्ही जर परवानगी दिली तर तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. म्हणूनच तुम्ही अशा वेबसाइटवर कोणताही प्रोग्रॅम चालवू नये.

  • मूळ वेबसाइटवर फिल्म किंवा वेबसीरीज पाहा

  • विनामूल्य चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही वेबसाइटला भेट देऊ नका.

  • आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी नेहमी अँटी व्हायरसचा वापर करा.

  • सायबर फसवणूक, डेटा चोरीला गेल्यास त्वरित पोलिसांना कळवा.


Mission Begin Again 2 | महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा,पूर्वीचेच नियम कायम