मुंबई: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या 1194 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.  दिवाळी 7 नोव्हेंबरला आहे. म्हणजेच त्यापूर्वी म्हाडाची लॉटरी निघेल हे आता निश्चित झालं आहे.


यापूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निघेल असं सांगितलं होतं. कोकण मंडळाच्या घरांची लॉटरीची सोडत गेल्या महिन्यात निघाली. त्यावेळी प्रकाश मेहतांनी ही माहिती दिली होती.

मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीकडे लक्ष असतं. परवडणारी घरं म्हणून म्हाडाच्या घरांकडे मुंबईकरांचा ओढा असतो.  मात्र गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांना परवडतील अशा घरांची लॉटरी असेल.

विशेष म्हणजे म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमती पाहता घराचं स्वप्न दुरापास्त होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे यंदा म्हाडाच्या लॉटरीत कमी किमतीची जास्त घरं ठेवण्यात आली आहेत.

कोणत्या भागात किती घरं? उत्पन्न गट 

ठिकाण - अँटॉप हिल, वडाळा,
उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट,
घरं - 278
किंमत - 30,71,000

ठिकाण - प्रतिक्षानगर, सायन,
उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट,
घरं - 83,
किंमत - 28,70, 700

ठिकाण - प्रतिक्षानगर, सायन (RRकडून प्राप्त)
उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट,
घरं - 5
किंमत - 16,40,364

ठिकाण - पी.एम.जी.पी. मानखुर्द
उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट,
घरं - 114
किंमत - 27,26,757

ठिकाण - गव्हाणपाड, मुलुंड
उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट
घरं - 269
किंमत - 30,07,027

ठिकाण - सिद्धार्थनगर, गोरेगाव
उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट
घरं - 24
किंमत - 31, 85, 000

ठिकाण - पंतनगर, घाटकोपर
उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट
घरं - 2

ठिकाण - टागोरनगर, विक्रोळी
उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट
घरं - 7

ठिकाण - महावीरनगर
उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट
घरं - 170
किंमत 58,66,300

ठिकाण - पंतनगर OB-1, घाटकोपर
उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट
घरं - 2

ठिकाण - सहकारनगर
उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट
घरं - 8

ठिकाण - बदानी बोरी चाळ, परेल
घरं - 68

33 (7) अंतर्गत प्राप्त
घरं - 28



संबंधित बातम्या

म्हाडा लॉटरी 2018, गरिबांसाठी घरांची संख्या जास्त!   

म्हाडाला उपरती, यंदा स्वस्त घरांची संख्या जास्त!  

30 वर्षांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरं मिळणार