मुंबईः ढोल-ताशांच्या गजरात काल बाप्पा विराजमान झाले. वर्षभर बाप्पांच्या आगमनाची वाट पाहिलेल्या भक्तांनी दीड दिवस मंगलमूर्तींची मनोभावे सेवा केली आणि आज जड मनाने बाप्पाला निरोप दिला.
विसर्जनासाठी मुंबईच्या जुहू आणि गिरगाव चौपाट्यांवर सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली. इको फ्रेण्डली गणपती घरी आणलेल्या भाविकांनी घरच्या घरीच गणपतीचं विसर्जन केलं. काही भक्तांनी विसर्जनासाठी खास तयार केलेल्या तलावात बाप्पांना निरोप दिला.
दरम्यान दीड दिवसाच्या गणपतीला निरोप देताना गणेशभक्तांना दाटून आलं. एक दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करुन आज निरोप देण्यात आला. दहा दिवसांच्या गणपतीची सध्या मुंबईसह राज्यभरात धूम सुरु आहे. अनेक गणेश मंडळांनी आकर्षक देखावेही तयार केले आहेत.