अंगावर झाड कोसळून मुंबईत एकाचा मृत्यू, चार जण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2018 08:36 PM (IST)
मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ एम.जी. रोड येथे झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जखमी झाले आहेत. यातील एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
मुंबई : झाड कोसळून मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ एम.जी. रोड येथे झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. यातील एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मेट्रो सिनेमाजवळ एम.जी. रोड येथे आझाद मैदानाला लागून असलेलं झाड संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कोसळलं. या दुर्घटनेत एकूण पाच जण जखमी झाले होते. यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सध्या एक जण गंभीर आहे. दरम्यान, मुंबईत झाड कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही दादरमध्ये झाड कोसळून पाच जण जखमी झाले होते. तर दहीसरमध्ये 14 वर्षीय मुलीचा अंगावर झाड पडून मृत्यू झाला होता. शिवाय अनेक गाड्यांचं नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. झाड पडून मृत्यू झालेल्या घटना 22 जुलै 2017 - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू 23 जुलै 2017 – किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू 7 डिसेंबर 2017 – शारदा घोडेस्वार – डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू 19 एप्रिल 2018 – दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू 9 जून 2018 - दहीसरमधील एस. एन. दुबे या रोडवर दृष्टी मुंगरा या मुलीचा झाड अंगावर झाड कोसळून मृत्यू 24 जून 2018 - मेट्रो सिनेमाजवळ झाड कोसळून एकाचा मृत्यू