मुंबई : मागील दोन वर्षभरापासून कोरोना महामारीने (coronavirus) संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. भारतातही या महामारीने धुमाकूळ घातला असताना मागील काहील दिवसांपासून हे संकट कमी होत आहे, असं वाटत होतं. पण त्यातच ओमायक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हेरियंटने आता शिरकाव केल्याने सर्वांची काळजी पुन्हा वाढली आहे. भारतातही नुकतंच या व्हेरियंटने शिरकाव केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेद्वारे दिली. महाराष्ट्राचं शेजारचं राज्य कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परीषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी मुंबईत अद्यापपर्यंत एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


यावेळी बोलताना त्यांनी मुंबईत परराज्यातून येणाऱ्यांना लसीकरण किंवा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य असल्याचंही स्पष्ट केलं. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने तुफान धुमाकूळ घातला होता. ज्यानंतर आता ओमायक्रॉनमुळे पुन्हा मोठी हानी होऊ नये, यासाठी प्रशासन उपाययोजना करताना दिसत आहे.


ओमायक्रॉनशी लढण्यासाठी जग सज्ज


आरोग्य मंत्रालयाच्या लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील 29 देशात 373 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचा व्हेरियंट बीटा आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, या व्हेरियंटमध्ये आतापर्यंत 42 ते 52 म्युटेशन आढळळे आहेत. आतापर्यंत आलेल्या अहवाला नुसार हा व्हेरियंट जास्त तीव्रतेचा नाही, असंही सांगण्यात आलं आहे. तसच जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने सकाळी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील काही अहवालांवरून ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टापेक्षा जास्त प्राणघातक नाही. ओमायक्रॉनमुळे आफ्रिकेत आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसल्याची माहितीही समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध मागे घेण्यास हरकत नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. 


संबंधित बातम्या :


Omicron variant : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली, मृत्यू दरातही घसरण  


Omicronच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क, RTPCR निगेटिव्ह आणि लसीकरण अनिवार्य, हे नियम वाचाच


ओमिक्रॉन फैलावतोय! अमेरिका, UAEसह 25 देशांमध्ये संसर्ग, पाहा यादी