मुंबईच्या नायर रुग्णालयात रुग्णांसाठी जुन्या नोटा बदलण्याची सुविधा
एबीपी माझा वेब टीम | 17 Nov 2016 11:14 PM (IST)
मुंबई : मुंबईच्या नायर रुग्णालयात रुग्णांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी जुन्या नोटा बदलण्याची सुविधा बँक ऑफ महाराष्ट्रने उपलब्ध करुन दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटल्स आणि मेडिकल स्टोअर्सना 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. पण तरीही चलन तुटवड्यामुळं रुग्णांची मोठी गैरसोय होते. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जुन्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. मात्र यावर बँक ऑफ महाराष्ट्रनं तोडगा शोधून काढला आहे. मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना नोटा बदलून देण्याची सोय बँक ऑफ महाराष्ट्रनं केली आहे. बँकेच्या या उपक्रमामुळं नायर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच मुंबईतल्या इतर प्रमुख हॉस्पिटलमध्ये ही सोय उपलब्ध करून देणार असल्याचं बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.