याचं सॉफ्टवेअर आणि डेमो मशिन तयार असून सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. लवकरच प्रवाशांना स्मार्ट कार्डशिवाय रेल्वेचं तिकीट काढता येणार आहे, असं सेंटर ऑफ रेल्वे इन्फर्मेशन सिस्टमचे (क्रिस) व्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितलं.
हे सॉफ्टवेअर रेल्वेकडे सुपूर्द केलं आहे. आता प्रतीक्षा आहे ती मध्य आणि पश्चिम रेल्वे आपल्या एटीव्हीएम मशिनवर डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी लागणारे पीओएस मशिन लावण्याची. त्यानंतर तुम्ही थेट डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तिकीट काढू शकता. प्रवाशांना यासाठी अतिरिक्त पैसेही मोजावे लागणार नाही, असंही उदय बोभाटे यांनी सांगितलं.
ट्रेनचं तिकीट काढणं आता आणखी सोपं...! | मुंबई | एबीपी माझा