मुंबई : सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे, पण भविष्यातलं मी सांगू शकत नाही, असे विधान काँग्रेसचे मुंबईतले ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी केलं. आधीच कृपाशंकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असताना, त्यांनी केलेल्या या सूचक विधानाने चर्चांना आणखीच बळ दिले आहे.


कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. कालच या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे कृपाशंकर यांच्यावर भाजपची कृपा होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. त्याच प्रश्नाला विचारताना कृपाशंकर यांचं आजचं विधान महत्त्वाचं आहे.

भाजपच्या कृपादृष्टीचे कारण काय?

  • मुंबईच्या उत्तर भारतीय राजकारणातील प्रभावशाली नेते

  • बेहिशेबी मालमत्तेचे आरोप झाल्यावर राजकीय विजनवासात

  • विजनवासाच्या काळातही मतदारसंघातील संपर्क कायम

  • कृपाशंकरांचा कलिना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात

  • युती न झाल्यास कृपाशंकरांमुळे भाजपकडे सबळ उमेदवार

  • उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातही कृपाशंकरांचं वर्चस्व

  • पूनम महाजन नसतील, तर कृपाशंकरांच्या नावाचा विचार होऊ शकतो

  • युती न झाल्यास कृपाशंकर उत्तर-पश्चिम मुंबईतही फायद्याचे ठरतील

  • शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांचा सामना करण्यास योग्य उमेदवार

  • गुरुदास कामतांच्या निधनानंतर काँग्रेसकडून संजय निरुपम उमेदवार असू शकतात

  • किर्तीकर, निरुपम यांच्या लढतीत कृपाशंकर तोडीस तोड ठरु शकतील


VIDEO : पाहा कृपाशंकर सिंग नेमकं काय म्हणाले?