नवी मुंबईः आपण कसल्याही सुट्टीवर जाणार नाही, असं स्पष्टीकरण नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलं आहे. मुंढे यांच्याविरोधात नगरसेवक अविश्वास ठराव आणणार आहेत. परंतु त्याआधीच तुकाराम मुंढे हे अनिश्चित काळासाठी सुट्टी टाकून गैरहजर राहणार असल्याची चर्चा होती.


तुकाराम मुंढेंवर आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप वगळता सर्वपक्षियांकडून अविश्वास ठराव आणला जाणार आहे. मात्र त्याआधीच तुकाराम मुंढेंनी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा होती. या चर्चांना तुकाराम मुंढे यांनीच पूर्ण विराम दिला.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून महापौर , नगरसेवकांचा , लोकप्रतिनिधींचा अवमान होणे , महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे , स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठरावात करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव


…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे



नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम