सायरस मिस्त्री टाटा सन्सविरोधात हायकोर्टात जाण्याच्या तयारीत
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2016 11:34 PM (IST)
नवी दिल्ली : टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आलेले सायरस मिस्त्री कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. टाटा सन्सच्या निर्णयाविरोधात मिस्त्री मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती आहे. सायरस मिस्त्री यांच्या जागी पुन्हा रतन टाटा चेअरमनपदाची धुरा सांभाळणार आहेत. चार महिन्यांसाठी रतन टाटा पदावर असतील. त्यानंतर सर्च पॅनेल नव्या चेअरमनची निवड करेल. सायरस मिस्त्री यांनी चार वर्षापूर्वीच म्हणजे 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा खांद्यावर घेतली होती. त्यावेळी रतन टाटांनी सायरस मिस्त्री ही जबाबदारी समर्थपणे सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला होता.