हेडलाईन्स


मुंबई : गिरगावातील जगन्नाथ शंकरशेठ रोडवरील 'मोहन' या 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, एक जण जखमी

-----------

दिवाळीआधी मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवणार, मुंबई महानगरपालिकेचा हायकोर्टात दावा

-----------

मुंबई : अंधेरीतील साकीनाक्यात खेरानी रोडजवळ आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दोन वॉटर टँकर घटनास्थळी

-----------

रायगड : मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी, कोलाडजवळ टँकर बंद पडल्याने वाहनांच्या रांगा

-----------

नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे अनिश्चित काळासाठी सुट्टीवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती, आज सर्वपक्षीय नगरसेवक मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मांडणार

-----------

बलुचिस्तानच्या क्वेट्टा शहरात पोलिस ट्रेनिंग कॉलेजच्या होस्टेलवर दहशतवादी हल्ला, 57 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा मृत्यू, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

-----------

पेंग्विनचा नव्हे आधी स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करा, उद्धव यांचा मनसेवर बोचरा वार, थायलंडहून नवा पेंग्विन मागवण्याचीही तयारी

-----------

'ऐ दिल है मुश्किल' प्रकरणी राज ठाकरेंनी तोडपाणी केलं, अजित पवारांना शंका, तर मुख्यमंत्री आणि राज यांच्यातील मांडवली जाहीर करा, काँग्रेसची मागणी

-----------

कल्याणमध्ये अनधिकृत गोदामांना आग, 4 गोदामं जळून खाक, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

-----------

टाटा समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांना हटवलं, नवा अध्यक्ष नियुक्त होईपर्यंत धुरा रतन टाटांकडे, मात्र गच्छंतीचं कारण गुलदस्त्यात

--------------

समाजवादी पक्षातल्या यादवीचं देशाला दर्शन, व्यासपीठावरच अखिलेश आणि मुलायम यांच्यात शाब्दीक चकमक, तर शिवपाल आणि अखिलेश यांच्यात धक्काबुक्की

-----------

ट्रिपल तलाकवरुन राजकारण करु नका, नरेंद्र मोदींचा सल्ला, मुस्लिम महिलांच्या हितासाठी तोंडी तलाक बंद करण्याचं समर्थन

-----------

हाजी अली प्रवेशासाठीच्या महिलांच्या लढ्याला ऐतिहासिक यश, सुप्रीम कोर्टात ट्रस्टनं हात टेकले, 4 आठवड्यात मजार पर्यंत दर्शन देण्याची सोय करणार

-----------

एबीपी माझा वेब टीम