मुंबई : ‘माझी गाडी कुणीही अडवली नाही.’ असं म्हणत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मोर्चेकऱ्यांनी गाडी अडवल्याचं वृत्त फेटाळलं आहे. मात्र, असं असलं तरी राणेंच्या गाडीवर चढून मोर्चेकऱ्यांनी आंदोलन केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.


नितेश राणेंची प्रतिक्रिया

 

दरम्यान, यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी असा दावा केला आहे की, 'आमदार नितेश राणेंनी आम्हाला बरंच सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला विधानभवनपर्यंत नेऊन लेखी निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का मिळवून दिला. त्यांची गाडी अडवण्यात आली होती. पण तो आमचा ग्रुप नव्हता.'

काय आहे नेमकं प्रकरण?

‘मराठा क्रांती मोर्चा संपल्यानंतर व्यासपीठावर आलात आता मराठा आरक्षणासंदर्भात लेखी आश्वासन द्या.’  अशी मागणी करत मोर्चेकरांनी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांची कार आझाद मैदान जवळील परिसरात अडवली.



मोर्चा संपल्यानंतर नितेश राणे व्यासपीठावर आले होते. त्यामुळं काहीशा चिडलेल्या मोर्चेकरांनी मोर्चा संपल्यानंतर नितेश राणेंची कार अडवून लेखी आश्वासनाची मागणी केली. दरम्यान, यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यानं त्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन नितेश राणेंना गाडीतून बाहेर काढलं आणि दुसरीकडे नेलं. मात्र, तरीही मोर्चेकरांनी त्यांच्या गाडीभोवती घेराव कायम ठेवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने जी आश्वासन दिले त्याच्या लेखी आश्वासनाची मागणी मोर्चेकरांनी नितेश राणेंकडे केली. त्यानंतर नितेश राणेंनी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना विधान भवनात नेलं.

संबंधित बातम्या :

मराठा मोर्चेकऱ्यांनी नितेश राणेंची गाडी अडवली!