मुंबई : देशातील विद्यापीठांसह महाविद्यालयं शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्यासाठी युजीसीने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, राज्यात विद्यापीठं आणि महाविद्यालये सुरु होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहवी लागणार आहे. कारण, युजीसीच्या गाईडलाइन्सनंतर राज्यातील कॉलेज सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दिवाळीनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री, कुलगुरूंच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उच्च शिक्षणंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
13 विद्यापीठांचा अपवाद वगळता सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची गाजलेली परीक्षा सुद्धा पार पडली आहे. पुणे कुलगुरूंनी सांगितले की मागच्या वर्षी पेक्षा 15 टक्के निकाल वाढला आहे. दिवाळीनंतर 15 दिवसात ज्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. शिवाय जे नापास झाले त्यांच्या सुद्धा एक महिन्यात परीक्षा घेतल्या जातील. परीक्षेदरम्यान एकही मुलगा कोरोनाबधित झाला नाही. आता ते ट्विट करून म्हणतील आम्ही होतो म्हणून झाला नाही. मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रामध्ये कुठेही बदल होणार नाहीत. आमचा अहवाल राज्यपालांकडे पाठवू. विद्यापीठांमध्ये जे प्रकार घडले त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
कॉलेज लगेच सुरु होणार नाही : मंत्री सामंत
युजीसीने गाईडलाइन्स दिल्या त्यांना आधी धन्यवाद देतो. कारण त्यांनी त्यात सांगितले की राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. युजीसीने पत्र दिलंय, त्यावर कुलगुरूंसोबत चर्चा केली आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या कुलगुरूंची बैठक दिवाळीनंतर घेणार आहोत. कॉलेज कधी सुरू करायचे याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. ऑनलाइन वर्ग घेऊन जर कॉलेज सुरू करता येतील का याबाबत चर्चा करू. माझ्या सहकाऱ्यांना मागणी करतो, तुमच्या काळात जे कुलगुरू नेमले गेले त्यांचे तरी कौतुक त्यांनी करायला हवं. कारण तुम्ही महाविकास आघाडीचं तर कौतुक करणार नाही.
विद्यापीठांसह शैक्षणिक संस्था, महाविद्यालये उघडण्यासाठी युजीसीकडून गाईडलाईन्स जारी
मराठा आरक्षण संदर्भात शालेय शिक्षण विभागाप्रमाणेच आमची भूमिका : मंत्री सामंत
प्रत्येक विद्यापीठात आता कुलगुरू विरोधात मोर्चे सुरू आहेत. मात्र, विद्यार्थी संघटनांना सांगू इच्छितो की प्रवेश प्रक्रिया सुरळीत होतील. युजीसीच्या पत्राबाबात मला एकाच सांगयाचं आहे, तुम्ही जे पत्र पाठवलंय त्याचा सकारात्मक विचार करू. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव बघूनच कॉलेज कधी सुरू करायचे याबाबत निर्णय होईल. त्यामुळे कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मराठा आरक्षण स्थगितीमुळे शालेय शिक्षण विभागाने जी भूमिका घेतली आहे. तीच भूमिका आमच्या विभागाची आहे. इंजिनियरिंग प्रवेश असू द्या किंवा इतर प्रवेश असू द्या यावर निर्णय झाल्यानंतर आपण प्रवेश सुरू करू. अभियांत्रिकी कॉलेज ऑनलाइन सुरू करायला आम्ही तयार आहोत. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली सज्ज आहे.
Exclusive | SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा मे पूर्वी शक्य नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI