मुंबई : ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन म्हणजेच, ATVM मशिन्स सुरु करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास क्रिस या रेल्वेच्या संस्थेला आदेश दिले आहेत. हे आवश्यक ते बदल झाल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन्स सुरु करण्यात येतील.

Continues below advertisement


लॉकडाऊन झाल्यापासून एटीव्हीएम मशीन बंद आहेत. केवळ तिकीट खिडक्यांवर तिकीट काढता येत आहे. मात्र प्रवाशांची संख्या वाढल्याने तिकीट घरात रांगा लागत आहेत. त्या कमी करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरेल. रेल्वे बोर्डाने 5 नोव्हेंबरला मध्य आणि पश्चिम रेल्वेला या विषयात एक पात्र लिहिले. त्या पत्रात एटीव्हीएम मशीन सुरु करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र या मशिन्स कधीपासून आणि कोणकोणत्या स्थानकांवर सुरु करायच्या याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सोपवला आहे. या मशिन्सचे तंत्रज्ञान क्रिस नावाची रेल्वेची संस्था बनवते. त्या संस्थेला, ज्यांच्याकडे स्मार्टकार्ड आहेत, त्यावरील कालमर्यादा वाढून देण्यात यावी असे देखील रेल्वे बोर्डाने सांगितले आहे. तसेच परवानगी नसलेल्या प्रवाशांना तिकीट काढता येणार नाही, याची काळजी घ्यावी असे रेल्वे बोर्डाने पत्रात नमूद केले आहे.


सध्या सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरु करण्यावरून राज्य आणि रेल्वेमध्ये वाद सुरु आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेकडून 88 टक्के लोकल सेवा करण्यात आल्या आहेत. त्यानंतर एटीव्हीएम मशीन देखील सुरु करण्यात येणार असल्याने, रेल्वे आपली तयारी पूर्ण असल्याचे दाखवून देते आहे. आता राज्य सरकार सर्व सामान्यांना कधी लोकल प्रवासासाठी परवानगी देते हे बघणे महत्वाचे आहे.


महत्त्वाच्या बातम्या :