Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर (Matoshree) भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर निलेश लंकेंच्या स्वागताचे बॅनर झळकले आहे. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला. निलेश लंके यांच्या विजयानंतर ते आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 


उद्धव ठाकरेंना भेटणं माझ्यासाठी आनंदाचा क्षण : निलेश लंके 


निलेश लंके यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा होता. त्यामुळे आज नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर जाऊन लंके उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. लोकसभेचं निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज त्यांच्या भेटीसाठी निलेश लंके मुंबईकडे रवाना झाले आहे. तर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटणं हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो, अशी भावना निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे.


बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा


निलेश लंके मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला येणार असल्याने त्यांच्या समर्थकांकडून स्वागताचे बॅनर मातोश्रीच्या बाहेर लावण्यात आले आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 


निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला 


दरम्यान,  अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) मतदारसंघातील भाजपचे (BJP)  पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)  यांनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यावर निलेश लंके यांनी सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा, असा खोचक टोला लगावला आहे.


आणखी वाचा 


बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप देशपांडेंना वरळीत आणूया, आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे पोस्टर्स