NIA Raids in Mumbai : मुंबईत (Mumbai) सकाळपासूनच एनआयएची (NIA) छापेमारी सुरू आहे. दाऊदशी संबंधित असल्याच्या संशयावरून तब्बल 29 ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी काही नागरिकांना अटक देखील केली आहे. नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईच्या माहीम (Mahim) भागात 4 ठिकाणी एनआयएची (NIA) छापेमारी सुरू असून यात माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांच्या मालमत्तांवरही छापेमारी सुरू आहे. तसेच ग्रँट रोड भागातून एनआयएनं छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला ताब्यात घेतलं आहे. तसेच अब्दुल कय्युम याला माहिम परिसरातून एनआयएनं ताब्यात घेतलं आहे. पायधुनी भागातही एका 71 वर्षाच्या व्यक्तीच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आलं आहे. संबंधित व्यक्ती दाऊद ट्रस्ट नावाची संस्था चालवत असल्याची माहिती आहे. दाऊदशी संबंधित ड्रग पेडलर्स, शार्प शूटर्स, आणि हवाला ऑपरेटर एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
एनआयएच्या रडावर असलेले सुहेल खंडवानी कोण?
सुहेल खंडवानी यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एनआयएकडून छापेमारी केली जात आहे. त्यांचा खांडवानी समूह (khandwani group) आणि रिअल इस्टेट आणि विकासक कार्यालयावर छापेमारी केली जात आहे. ते माहीम दर्गाचे व्यवस्थापकीय विश्वस्त असल्यानं मुस्लिम समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. कोरोना महामारीच्या काळात दर्गा ट्रस्टनं संपूर्ण मुंबईत रेशन किटचं वाटप केलं होतं.
सुहेल खंडवानी 1993 पूर्वी याकुब मेमनचा साथीदार होते. याकुब मेमनला काही वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली होती. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा तो भाऊ आहे. तपास संस्थेने नोव्हेंबर 1994 मध्ये याकुबचा भागीदार सुहेल खंडवानी यांच्याकडून 44 लाख रुपये जप्त केले होते आणि मे 1995 मध्ये गोव्याच्या तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी खांडवानी यांना दिलेले 60 लाख रुपये जप्त केले होते, अशी माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
NIA Raids : NIA कडून मुंबईत 29 ठिकाणी छापे; दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधितांवर कारवाई