नवी मुंबई : वाशी खाडीपुलाच्या जॉईंडर दुरुस्तीचं काम पुढे ढकलण्यात आलं आहे. आता 1 फेब्रुवारीपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्या वाशी खाडी पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने लोखंडी जॉईंडरची झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील जाईंडर दुरूस्तीचं काम उद्यापासून 12 फेब्रुवारीपर्यंत हाती घेण्यात येणार होतं.
या कामामुळे 20 दिवस वाशी खाडी पुलावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर इतर वाहतुकीतही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते.
पण आता हे काम पुढे ढकलण्यात आलं असून, 1 फेब्रुवारीपासून या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या
नव्या वाशी खाडी पुलावर 20 दिवस दुरुस्तीचं काम, एक मार्ग बंद
नव्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम पुढे ढकललं
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
22 Jan 2018 11:21 PM (IST)
1 फेब्रुवारीपासून नव्या वाशी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -