Central, Western Railway Will Get 20 New AC Trains : मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 20 नवीन एसी लोकल गाड्या धावणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर 44 लोकल ट्रेन धावत आहेत. तिकीट दरात कपात झाल्यानंतर एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हार्बर लाईनवरील एसी लोकल सेवेला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावर एसी लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेत सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढे हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा बंद करण्यात येईल. मध्य रेल्वेवर 1 मे ते 8 मे दरम्यान दररोज 28 हजार 141 प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. मध्ये रेल्वेवर एकुण 24 हजार 842 प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. तर हार्बर मार्गावर 3 हजार 299 प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. 


हार्बरवर पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने एसी लोकल बंद
एप्रिल महिन्यात दररोज सुमारे 19 हाजर 761 प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. यामध्ये 17 हजार 473 प्रवाशांनी मध्य रेल्वेवर तर 2 हजार 288 प्रवाशांनी हार्बर लाईनवर एसी लोकलने प्रवास केला. एसी लोकलला हार्बर मार्गावर पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने या मार्गावरील एसी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद करुन लोकल ट्रेन मध्य रेल्वे मार्गावर वळवण्यात येईल.


दरम्यान, विभागीय रेल्वेला नवीन एसी लोकल गाड्या मिळणार असल्याने पश्चिम रेल्वेवर नवीन एसी सेवा सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, सध्या पश्चिम रेल्वेवर तीन एसी लोकल धावत आहेत. एक ट्रेन वेळोवेळी दुरुस्तीसाठी असते. एसी ट्रेनच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. नवीन ट्रेनला सध्याच्या ट्रेनऐवजी बदलण्यात येतील.




 


भाडे कमी झाल्यानंतर एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली
रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांसाठी मर्यादित एसी लोकल ट्रेन सेवा उपलब्ध असेल. रेल्वे प्रशासनाने 5 मे पासून तिकीटदरात 50 टक्क्यांनी कपात केल्यानंतर एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील भाडे कमी केले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या