मुंबई : एसी लोकलला प्रवाशांचा मिळत असलेला अतिशय थंड प्रतिसाद बघून या लोकलच्या तिकिटांचे दर पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. काल 5 मे पासून सुधारित दर लागू करण्यात आले आणि याचा चांगलाच फायदा प्रवाशांनी घेतल्याचे दिसून येत आहे. दर कपातीनंतर प्रवाशांनी एसी लोकलला पसंती दिल्याचं दिसतं. परिणामी लोकलमधील प्रवासी संख्या वाढल्याचं दिसत आहे.


एकीकडे मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये वाढत असलेला उकाडा तर दुसरीकडे लोकलमध्ये वाढलेली गर्दी यातून मार्ग म्हणून एसी लोकलचा पर्याय प्रवाशांनी निवडला आहे. काल दुपारी दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकलच्या 2 हजार 308 तिकिटांची विक्री झाली होती. तर पश्चिम रेल्वेवरही 3 हजार 52 तिकिटे खरेदी करण्यात आली. हा प्रतिसाद इतर दिवसांच्या तुलनेत चांगला असल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वेने केला आहे. प्रवासी संख्या आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 


कमी झालेले तिकिटांचे दर प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी ठरल्याने आजदेखील एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिसून येत होता. तिकिटांचे दर कमी केल्याने खूश झालेल्या प्रवाशांनी एसी लोकलच्या फेऱ्या आता वाढवल्या पाहिजेत असं म्हटलं आहेल. तसंच मासिक पासचे दर देखील शासनाने कमी करायला हवेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.


Mumbai Local: आजपासून मुंबईकरांचा 'फर्स्ट क्लास' एसी लोकलचा प्रवास स्वस्त; जाणून घ्या नवीन तिकीट दर


नवीन तिकीट दर 


>> मध्य रेल्वेवर तिकीट दर किती?


चर्चगेट पासून प्रवास दर (जुना तिकीट दर आणि नवीन तिकीट दर)


मुंबई सेंट्रल - एसी - 65 चे 35 फर्स्ट क्लास - 50 चे 25


दादर - एसी - 90 चे 50 फर्स्ट क्लास - 70 चे 40


वांद्रे - एसी - 90 चे 50 फर्स्ट क्लास - 70 चे 40


अंधेरी -एसी - 135 चे 70 फर्स्ट क्लास - 105 चे 60


बोरिवली - एसी - 180 चे 95 फर्स्ट क्लास - 140 चे 85


भाईंदर - एसी - 190 चे 100 फर्स्ट क्लास - 150 चे 90


वसई रोड -एसी - 210 चे 105 फर्स्ट क्लास - 165 चे 100


नालासोपारा - एसी - 220 चे 115 फर्स्ट क्लास - 170 चे 100


विरार - एसी - 220 चे 115, फर्स्ट क्लास - 170 चे 100



>> मध्य रेल्वेवर तिकीट दर किती?


सीएसएमटीपासून (जुने दर - नवे दर)


भायखळा - एसी - 65 चे 35, फर्स्ट क्लास - 50 चे 25


दादर - एसी - 65 चे 35, फर्स्ट क्लास - 50 चे 25


कुर्ला - एसी - 135 चे 70, फर्स्ट क्लास - 105 चे 60
 
घाटकोपर - एसी - 135 चे 70, फर्स्ट क्लास - 105 चे 60


मुलुंड - एसी - 180 चे 95, फर्स्ट क्लास - 140 चे 85


ठाणे - एसी - 180 चे 95, फर्स्ट क्लास - 140 चे 85


दिवा - एसी - 190 चे 100, फर्स्ट क्लास - 150 चे 90


डोंबिवली - एसी - 205 चे 105, फर्स्ट क्लास - 160 चे 95


कल्याण - एसी - 210 चे 105, फर्स्ट क्लास - 165 चे 100