मुंबई : मध्य रेल्वे नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या (Neral-Matheran Toy Train) इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचं रुप देणार असून, पर्वतीय रेल्वेच्या वैभवशाली प्रवासाचा अनुभव पुन्हा जिवंत करणार आहे. मध्य रेल्वेचे माथेरान हे सुट्टीचे सर्वात आवडते ठिकाण आहे आणि मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी नॅरो गेज मार्गावरील टॉय ट्रेन सेवा पर्यटकाचं आकर्षण आहे. नेरळ ते माथेरान पर्यंतच्या उंच पर्वतरांगा पाहणे हे प्रत्येक पर्यटकाचे स्वप्न असते. नेरळ ते माथेरान प्रवास करण्यासाठी टॉय ट्रेन सेवा प्रचंड लोकप्रिय आहे. भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान लाइट रेल्वेने 1907 मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेसह 116 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत.


नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं रुपडं पालटणार


आता नेरळ-माथेरान भागावर सध्याच्या डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतील अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम बदल करण्यासाठी, स्टीम इंजिन हूडचे मॉडेल तयार करण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी 24 तास काम करत आहेत. यामुळे इंजिन सुरळीत चालून त्याचे ऐतिहासिक सौंदर्य देखील राखता येईल, हा प्रयत्न आहे. इंजिनला हेरिटेज लूक देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश होता.


वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वैभवशाली इतिहास जिवंत होणार


यामध्ये सध्याच्या इंजिनचे हूड काढून टाकणे, हुड सारख्या नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग, सध्याच्या डिझेल इंजिनमध्ये बदल करणे, वाफेचे फिटिंग आणि ध्वनी उत्पादन प्रणाली आणि शेवटी नवीन ऐतिहासिक हुडसह इंजिनचे पेंटिंग आणि आवश्यकतेनुसार, स्टिकर्ससह सजावट करणे. नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम 1904 मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईन अखेरीस 1907 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून, पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो. अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही सुरू असते. 


टॉय ट्रेनच्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचं रुप


मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर यासारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. याशिवाय, पर्यटकांना जास्तीत जास्त आराम आणि गोपनीयता देण्यासाठी डिझाइन केलेले, पर्यटकांसाठी स्लीपिंग पॉड्सही तयार करण्यात येणार आहेत. रूम सर्व्हिसेस, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम सुविधा, अशा इतर सुविधा. 


पर्यटनाला चालना मिळणार


यामुळे पर्यटकांसाठी एकंदर अनुभव वाढवून पर्यटनाला चालना देऊन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देईल. नेरळ-माथेरान टाय ट्रेनचा प्रवास ऐतिहासिक ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा, निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होण्याचा विलोभनीय अनुभव देईल.