मुंबई: ‘आमचे कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नाही. सर्व आमदार शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत. तरीही भाजपचा तसा दावा असेल तर त्यांना तो लखलाभ असो.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
काही वेळापूर्वीच भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यावेळी मध्यावध्यी निवडणुका किंवा काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून आणणं या दोन पर्यायांवर चर्चा झाली. त्यासंबंधी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ‘आमचे कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नाही. सर्व आमदार हे शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे असं जर कुणी म्हणत असेल तर ती अफवा आहे.’
दरम्यान, आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेच्या वर्तणुकीवर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशी महिती सुत्रांनी दिली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या कायम असणाऱ्या विरोधी भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत यासंबंधी दोन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काय झालं भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत?
कोअर कमिटीच्या बैठकीत झाली दोन पर्यायावर चर्चा झाली.
पहिला पर्याय: थेट मध्यवर्ती निवडणुकांना सामोरे जाणं.
दुसरा पर्याय: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडून त्यांना पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडून आणणं.
– काँग्रेसचे 15 आणि राष्ट्रवादीचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. यातील 21 आमदार जे पुन्हा नक्की निवडून येऊ शकतात अशांना भाजप घेऊ शकते.
– या दोन्ही पर्यायांवर 50-50% मत कोअर कमिटीमध्ये पडली. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत दिल्लीला कळवण्यात येणार असल्याचं समजतं आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.
संबंधित बातम्या:
शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची भाजपची तयारी: सूत्र
आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी आता शिवसेना मैदानात !
लोकांनी आमदारांचे कपडे काढायचं बाकी राहिलंय, सेनेचे आमदार मंत्र्यांवर वैतागले !
आमदारांचं निलंबन असंवैधानिक, लोकशाहीचा खून: जयंत पाटील
..म्हणून मोजून 19 आमदारांचं निलंबन : पृथ्वीराज चव्हाण
कर्जमाफीवरुन निलंबन चुकीचं, आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध