मुंबई: गेल्या चार दिवसांपासून संपावर असलेल्या डॉक्टरांना आज मुंबई हायकोर्टानं पुन्हा झापलं. मात्र तरीही डॉक्टरांचा अडमुठेपणा कायम आहे. कारण कोर्टानं हजर व्हा. असे आदेश दिल्यानंतरही डॉक्टरांचा संप कायम आहे.
जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर कामावर रुजू होणार नाही. अशी भूमिका मार्डच्या डॉक्टरांनी घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नाही. बैठक सकारात्मक झाल्याचा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
कोर्टात नेमकं काय झालं?
डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं आणि सरकारला योग्य सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी काही वेळ द्यावा.
रुग्णाबरोबर फक्त 2 नातेवाईक राहतील असा नियम करा.
1100 सशस्त्र सुरक्षारक्षक डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी वाढवले जातील.
5 एप्रिलपर्यंत 500 गार्ड प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तैनात करा.
उरलेले 600 गार्ड 30 एप्रिलपर्यंत तैनात करण्याचे कोर्टाचे आदेश.
सरकारने हायकोर्टात काय माहिती दिली?
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये 1100 सशस्त्र सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाईल, असे राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात सांगण्यात आले. त्यावेळी, 500 सुरक्षारक्षक येत्या 5 एप्रिलपर्यंत, तर उर्वरित 600 सुरक्षारक्षक 13 एप्रिलपर्यंत रुग्णालयात तैनात करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. यावर राज्य सरकारनेही सहमती दर्शवली.
रुग्णालयात रुग्णाबरोबर केवळ दोनच नातेवाईक राहतील, असा नियम करण्याची सूचनाही हायकोर्टाने राज्य सराकरला केली.
निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची अवस्थाही वाईट असून, त्यांना राहण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले.
संबंधित बातम्या:
‘मार्ड’ आंदोलनावर ठाम, डॉक्टरांचा संप चिघळण्याची शक्यता
‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे’, गिरीश महाजन यांचा दावा
आज रात्री 8 पर्यंत रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू : सरकार
नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित
हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट
डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी
राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल
सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे
इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता
धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास
धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती