महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या कायम असणाऱ्या विरोधी भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत यासंबंधी दोन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पहिला पर्याय म्हणजे थेट मध्यावधी निवडणुका घेण्यात याव्या. तर दुसरा पर्याय म्हणजे भाजपच्या संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून भाजपच्या चिन्हावर निवडून आणावं अशीही भाजपनं तयारी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हं आहेत.
नेहमी सरकारला अडचणीत आणण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर भाजप आक्रमक झालं आहे.
काय झालं कोअर कमिटीच्या बैठकीत?
कोअर कमिटीच्या बैठकीत झाली दोन पर्यायावर चर्चा झाली.
पहिला पर्याय: थेट मध्यवर्ती निवडणुकांना सामोरे जाणं.
दुसरा पर्याय: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडून त्यांना पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडून आणणं.
- काँग्रेसचे 15 आणि राष्ट्रवादीचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. यातील 21 आमदार जे पुन्हा नक्की निवडून येऊ शकतात अशांना भाजप घेऊ शकते.
- या दोन्ही पर्यायांवर 50-50% मत कोअर कमिटीमध्ये पडली. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत दिल्लीला कळवण्यात येणार असल्याचं समजतं आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाचे आमदार निलंबित केल्यावर शिवसेनेनं या निलंबित आमदारांचे निलंबन रद्द करण्यात यावं अशी भूमिका घेतली. शिवसेनेच्या या वर्तणुकीमुळे सरकारची डोकेदुखी वाढली. शिवसेनेच्या या विरोधी भुमिकेमुळे खुद्द मुख्यमंत्रीही वैतागले असल्याचं समजतं आहे.
संबंधित बातम्या:
आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी आता शिवसेना मैदानात !
लोकांनी आमदारांचे कपडे काढायचं बाकी राहिलंय, सेनेचे आमदार मंत्र्यांवर वैतागले !
आमदारांचं निलंबन असंवैधानिक, लोकशाहीचा खून: जयंत पाटील
..म्हणून मोजून 19 आमदारांचं निलंबन : पृथ्वीराज चव्हाण
कर्जमाफीवरुन निलंबन चुकीचं, आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध