ठाणे : बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखं आंदोलन केले. बदलापूर शहरात डासांनी हैदोस घातला असल्याने नगरपालिका कोणत्याच उपाययोजना करत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.


बदलापूर शहराच्या सर्वच भागात सध्या डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला असून पालिकेच्या वतीने केली जाणारी औषध फवारणी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसनं पालिकेच्या गेटवर मच्छरदाणी बांधत डासांच्या कॉईल जाळल्या.

तसेच, पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनाही मच्छरदाणी, कॉईल आणि ओडोमॉस भेट देण्यात आलं. एकीकडे स्वच्छता सर्वेक्षणासाठी पालिका लाखो रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात मात्र पालिका अपयशी ठरत आहे. त्यामुळे निषेध केल्याचं राष्ट्रवादीचे नेते अविनाश देशमुख यांनी सांगितलं.