Drugs Case LIVE Updates : ड्रग्ज प्रकरणाचा वाद शिगेला, वाचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Mumbai Cruise Drugs Case Nawab Malik Sameer Wankhede Live Updates BJP devendra Fadnavis : ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेला भाजप विरुद्ध नवाब मलिक वाद टोकाला गेला आहे. वाचा प्रत्येक अपडेट्स...

abp majha web team Last Updated: 10 Nov 2021 10:20 AM
डुकराशी कधीही कुस्ती खेळू नये- देवेंद्र फडणवीस

'मी खूप पूर्वी शिकलो, डुकराशी कधीही कुस्ती खेळू नये. तुम्ही घाणेरडे व्हाल आणि त्याशिवाय, डुकराला ते आवडते!' देवेंद्र फडणवीस यांनी हे कोट ट्विट करून सूचक इशारा दिला आहे.


 





रतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन

नागपूरच्या गणेशपेठ चौकात थोड्यावेळाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध असा आरोप ठेवत हे आंदोलन होणार आहे..


 

रियाझ भाटी दाऊद इब्राहीमचा माणूस - मलिक

मलिक म्हणाले की, बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला पकडलं होतं. तो अद्यापही फरार आहे. सगळ्या शहराला माहितीय रियाज भाटी कोण आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो.  पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जात त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो.  पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत. एखादा गुंड, क्रिमीनल सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा असा सवाल मलिक यांनी केला आहे. रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे असंही मलिक म्हणाले. 


 

बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु-मलिक

सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता. बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता. मलिक म्हणाले की,  खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनीच केलं.  खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते, असं ते म्हणाले.  खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेख हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन अल्पसंख्याक कमिशनचा अध्यक्ष आहे, असं मलिक म्हणाले. 

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं- नवाब मलिक

Nawab Malik on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

पार्श्वभूमी

Mumbai Cruise Drugs Case Nawab Malik Sameer Wankhede Live Updates BJP devendra Fadnavis : : काल देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक (Nawab Malik) पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत. काल फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मलिक यांनी म्हटलं होतं की, उद्या सकाळी फडणवीसांचं अंडरवर्ल्डशी असलेलं नातं उघड करणार आहे. तसेच, फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या साथीनं राज्य वेठीस धरलं होतं. असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. फडणवीस माझं नाव खराब करण्याचं काम करत आहेत. मागेही पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या जावयाच्या घरात गांजा सापडला होता. याप्रकरणी माझी मुलगी तुम्हाला नोटीस पाठवत आहे, असंही मलिकांनी सांगितलं होता. त्यामुळं नवाब मलिक आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष लागून आहे. 


अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक बोलताना काल म्हणाले की, "देवेंद्रजी तुम्ही थेट बॉम्ब ब्लास्ट, दाऊद, अंडरवर्ल्डशी जोडून माझी प्रतिमा मलीन करण्याचं नाव करत आहात. काही दिवसांपूर्वी तुम्ही पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांच्या जावयाच्या घरी गांजा सापडला असं म्हणाला होतात. याप्रकरणी माझी मुलगी उद्या तुम्हाला नोटीस पाठवणार आहे. आरोप लावून तुम्ही माफी मागणार नसाल तर आम्ही आशा करतो की, या लढाईत तुम्ही माफी मागणार नाही, लढाई सुरुच ठेवू." तसेच पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "ही फाईल एनआयएकडे द्या किंवा सीबीआयकडे द्या, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. जे आज मी बोलतोय, तो सगळा घटनाक्रम जसंच्या तसं घडला आहे. एनआयए असो किंवा सीबीआय चौकशी करो. त्यांना वाटेल नवाब मलिक घाबरणार. पण नवाब मलिक घाबरणार नाही."


उद्या सकाळी दहापर्यंत थांबा, फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड संबंधाचा पर्दाफाश करणार : नवाब मलिक 


देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन होते. याचा खुलासा उद्या सकाळी मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की दिवाळीनंतर फटाके फोडू, पण मला वाटतं फटाके भिजले आणि वाया गेले. नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी 1999 ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र 62 वर्षांच्या कार्यकाळात किंवा 26 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती कोणीतरी देतोय.. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. अंडरवर्ल्डचा खेळ जो सुरु केला आहे, आज मी बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी 10 वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.








- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.