मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. सकाळी औरंगाबाद इथे जाऊन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर दुपारी 2 वाजता मुंबईत मातोश्रीवर (उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत, शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

भास्कर जाधव हे दोन वेळा गुहागर मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर तब्बल 72 हजार 525 मतांसह विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी भाजपच्या डॉ. विनय नातू (39 हजार 761 मतं) आणि शिवसेनेच्या विजय कुमार भोसले (32 हजार 83 मतं) यांचा पराभव केला होता.


राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष टू व्हीलरवरुन आले