मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफल्ल पटेल आज सक्तवसुली संचलनालय कार्यालयात हजर झाले आहेत.  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या इक्बाल मिर्चीबरोबर कथित आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप पटेलांवर आहे. या प्रकरणी ईडीने प्रफल्ल पटेलांना  नोटीस बजावली होती. त्यानुसार पटेल ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.


या प्रकरणात प्रफुल पटेलांनी संबंधित करार करताना कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  ईडीची नोटीस जाहीर झाल्यानंतर पटेल यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली होती. ही प्रॉपर्टी हजरा इकबाल मेमन यांची असल्याकारणाने याच्या व्यवहाराचा आमच्याशी संबंध नसल्याचं पटेल यांनी पत्रकारांना सांगितलं.

दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा निकटवर्तीय इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना 200 कोटींच्या जमीनप्रकरणात अटक करण्यात आली आहे. हारुन युसूफ आणि रंजित सिंग बिंद्रा अशी अटकेतील आरोपींची नाव असून बिंद्रा दलाली करत असे, तर युसूफ ट्रस्टला पैसे आणि लॉजिस्टिक पुरवण्याचं काम करत असे.

ED summons Praful Patel | ईडीच्या रडावर आता प्रफुल पटेल | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha



काय आहे प्रकरण ?

मिलेनियम डेव्हलपर्स वरळी येथे सी जे व्यावसायिक इमारत 2006-2007 मध्ये बांधली होती. 2007 मध्ये या इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला मिर्ची परिवाराला मिलेनियम डेव्हलपर्सकडून देण्यात आला होता. हा व्यवहार संशयास्पद असल्यामुळे ED या प्रकाराची चौकशी करत आहे.

इकबाल मिर्चीशी निगडित बेनामी संपत्तीची यादी

सीजे हाऊस – वरळी, मुंबई

सहा एकर जागेवर बंगला - खंडाळा

साहिल बंगला – वरळी, मुंबई

समंदर महल (ए) विंग – वरळी, मुंबई

न्यू रोशन टॉकीज - भायखळा, मुंबई

तीन दुकान - क्रॉफर्ड मार्केट, मुंबई

मिनाज हॉटेल - तारा रोड जुहू,  मुंबई

आलिशान बंगला – पाचगणी, नाशिक

Praful Patel | प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस, 18 तारखेला दिल्लीत चौकशी | मुंबई | ABP Majha