तब्येत बिघडल्याने गेल्या दोन दिवसांपासून बिग बी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 16 ऑक्टोबरला पहाटे यकृताच्या आजारामुळे त्यांना नानावटीमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र केवळ नियमित चेकअप असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. सर्व आरोग्य तपासण्या करण्यासाठी बिग बी रुग्णालयात आले होते. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून काळजीचं कोणतंही कारण नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान यकृताच्या आजाराबाबत रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र बिग बी रुग्णालयात असले तरी देखील ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत. काल रात्री अकराच्या सुमारास बिग बींनी ब्लॉग लिहिलाय.