Nawab Malik: आपण वानखेडेंबाबत कोणतेही चुकीचे व्यक्तव्य केलेलं नसून समीर वानखेडेंच्या माध्यमातून केंद्रीय तपासयंत्रणेच्या दबाबतंत्रावर बोलण्याचा आपला अधिकार अबाधित असल्याचा दावा करत सोमवारी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हायकोर्टात (Bombay High Court) जातीनं हजर राहून आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी देऊनही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून बदनामी सुरूच असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे कुटुंबियातील वाद शमण्याचं काही नाव घेत नाहीत. याआधी मुंबई उच्च न्यायालयातील निकाल लागेपर्यंत वानखेडेंबाबत कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी नबाव मलिकांनी दिली असतानाही त्यांच्याकडून वानखेडें आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मलिकांची विधानं सुरूच आहेत. यामुळे नवाब मलिक यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करत ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मलिक यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच याचिकेचा खर्चही दंड म्हणून वसूल करावा, अशी मागणी वानखेडे यांनी या याचिकेतून केली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं मागील सुनावणीदरम्यान, मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.


त्यानुसार, सोमवारी सुनावणीदरम्यान, नवाब मलिक स्वत: हे मुंबई उच्च न्यायालयात हजर होते. त्यांच्याकडून खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्यात आले. तसेच समीर वानखेडेंच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबाबतंत्रावर बोलण्याचा आपला अधिकार अबाधित असल्याचा दावा मलिक यांच्यावतीनं करण्यात आला. मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणावर हायकोर्टानं असमाधान व्यक्त केलं आङे. आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वानखेडेंची बदनामी करणं थांबवा, असं स्पष्ट करत सुनावणी पुढील आठवड्यात निश्चित केली आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha