मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या दाव्यांना राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हालचालीबाबत भ्रम निर्माण करणारी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करु शकत नाही, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
अनिल देशमुख कोरोनाची लागण झाल्याने 5 फेब्रुवारीपासून 15 तारखेपर्यंत नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल होते. ते नागपूरमध्ये होम क्वॉरंटाईन होते असं कुणीही सांगितलेलं नाही. अनिल देशमुख मुंबईत होम क्वॉरंटाईन होते. 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत ते शासकीय निवासस्थानी आयसोलेशनमध्ये होते. यादरम्यान त्यांनी कुठल्याही सार्वजिनिक कार्यक्रमाता सहभाग घेतला नाही. पोलीसांच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती देऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल केली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
अनिल देशमुखांचा पाठिशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला : देवेंद्र फडणवीस
कोणताही मंत्री पोलीस अधिकाऱ्यांनी थेट बदली करु शकत नाही- नवाब मलिक
देवंद्र फडणवीस यांनी पोलीस बदली घोटाळ्याच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना नवाब मलिक यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस राज्याची मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते त्यांना चांगलं माहिती असेल कुठलाही मंत्री अथवा गृहमंत्री अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या करु शकत नाही. बदल्यांसाठी पोलीस एस्टाब्लिशमेंट बोर्ड कमिटी असते. आयपीएस अधिकाऱ्यांनाच्या बदल्यांसाठी ही कमिटी प्रस्ताव तयार करते. या बोर्डमधील सदस्यांच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव गृहमंत्र्यांच्या कार्यालयात येतो. येथ हे अधिकारी आपलं मत नोंदवतात. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात मान्येतसाठी हा प्रस्ताव पाठवल्यानंतर या बदल्यांच्या ऑर्डर्स निघतात. त्यामुळे कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री अधिकाऱ्यांची थेट बदली करु शकत नाहीत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
अहवालातील 80 टक्के बदल्या त्या पद्धतीने झाल्याच नाहीत- नवाब मलिक
पोलीस बदलीची नियमावली माहित असताना देवेंद्र फडणवीस चुकीची माहिती देत आहेत. सरकारल बदनाम करण्याचा कट फडणवीस करत आहेत. रश्मी शुक्ला कोणतीही परवानगी न घेता फोन टॅप करत होत्या. राज्यात सरकार स्थापनेच्या काळातही रश्मी शुक्ला अनेक नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. रश्मी शुक्ला भाजपच्या एंजट या नात्याने हे काम करत होत्या. पोलीस अधिकार बदली घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस ज्या अहवालाचा दाखला देत आहेत त्यातल्या 80 टक्के बदल्या त्या पद्धतीने झाल्याच नाहीत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
भाजपचे नेते सत्ता गेल्यानंतर हे सरकार जाईल यासाठी तारखा देत होते. यांना सरकार पाडता आलं नाही त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचं काम करत आहेत. केंद्रीय गृहसचिवा़कडे देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. याचा अर्थ त्यांना सरकार पाडता येत नाही त्यामुळे अधिकार्यांना हाताशी धरून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यामुळे देशमुख राजीनामा देणार नाहीत: शरद पवार
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?
देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्रे सादर करत अनिल देशमुख खासगी विमानाने नागपूरहून मुंबईला आले होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांना काल चुकीची माहिती दिली होती. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. अनिल देशमुखांचा पाठिशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आपण केंद्रीय गृहसचिवांना भेटून मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं फडणवीस म्हणाले. तसेच बदल्यांचं रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकलं. सुबोध जयस्वाल यांनीही कारवाईची मागणी केली तीही झाली नाही. त्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले.. उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला.