दिल्ली : अनिल देशमुख यांच्याबाबत तुम्ही काल मला प्रश्न विचारले मी तुम्हाला आज बोलतो असे सांगितले होते. आयुक्तांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. माझ्याकडे जी  कागदपत्रे आहेत त्यानुसार 5 ते 15 फेब्रुवारी अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. नागपूरमधील रुग्णालयाकडून काही कागदपत्र मिळवली आहेत, त्या रुग्णालयाने सर्टिफिकेट दिलं आहे. अनिल देशमुख हे 17 दिवस भरती होते. आज हातात आल्याल्या माहितीवरून देशमुखांविरोधात केलेल्या आरोपात तथ्य नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

Continues below advertisement


तपास विचलीत करण्यासाठी आरोप : शरद पवार


शरद पवार म्हणाले, 6 ते 15 फेब्रुवारीपर्यंत देशमुख कोरोनाबाधित असल्यामुळे रुग्णालयात भरती होते. रुग्णालयातील कागदपत्रावरुन देखील  देशमुख हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना 15 फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर  15 दिवसांचा होमक्वारंटाईन सांगितलं. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे. 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. त्यामुळे या दरम्यान अनिल देशमुख होम कॉरेन्टाईन होते. त्यामुळे केलेले आरोप हे तथ्यहीन होते. महाराष्ट्र एटीएस योग्य दिशेने तपास करत आहे, त्यांचा तपास विचलीत करण्यासाठी असे आरोप होत आहेत 


 एक महिना पोलिस आयुक्त शांत का बसले? : शरद पवार


फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असा जर परमबीर सिंग यांचा आरोप आहे. तर मग आरोप करण्यासाठी परमबीर एक महिना का थांबले असा सवाल देखील शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परमबीर सिंह यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग दिलं होतं.