मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे कि, प्राथमिक तपासणी झाल्यावर त्यांच्यावर ठपका असणार नाही. अनिल देशमुख लवकर मंत्रिमंडळात दिसतील.  सीबीआय चौकशी नंतर आमचा पक्ष त्यांचा विचार नक्की करेल, ते विदर्भातील ते प्रमुख नेते आहेत, असं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 
 
संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांचं हे गंभीर विधान आहे. राजकीय उद्देशाने विधान केले असं दिसत आहे. याची गांभीर्याने नोंद घेतील, असं ते म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले की,  त्यांनी जे विधान केले स्थानिक परिस्थितीबाबत केलं. कल्याण काळे पक्ष प्रवेशाविषयी ते बोलले. भाजपची वापर करून फेकून द्यायची वृत्ती आहे, त्याबाबत विधान केले. 


Maharashtra Corona Vaccine Shortage : लसटंचाई... अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद, कोणत्या जिल्ह्यात किती साठा शिल्लक? वाचा सविस्तर


जयंत पाटील म्हणाले की, या सरकार मागे सरकार कधी जाईल याची वाट पाहणाऱ्या शक्ती आहे असं जनतेला दिसत आहे.  भाजप नेत्यांनी दोन तीन दिवस थांबा अजून एक विकेट पडेल अशी भाष्य करणं आणि नंतर NIA मधून पत्र बाहेर येतं.  भाजप नेते बोलतात त्यानंतर NIA कडून माहिती बाहेर येते.  तपास सुरु आहे की राजकारण सुरु आहे ही परिस्थिती आहे, असं ते म्हणाले. 


ते म्हणाले की, तुरुंगात बसणारा माणूस ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे.  ज्याने स्फोटक भरलेली गाडी ठेवली.  ज्याच्यावर आरोप त्याच्याच बातम्या जास्त आहेत. खुनाचे आरोप आहे त्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल त्यांनी केला. भ्रष्टाचार होत असेल सात दिवसाच्या आत तक्रार केली पाहिजे. पण आता काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून बोलत आहेत. लोकांचं लक्ष विचलित ठेवून नको त्या चर्चा घडवून आणणे असा प्रकार सुरु आहे, असं पाटील म्हणाले. 


पाटील म्हणाले की, केंद्राने जीएसटी परतावा कमी दिला बोलायचं नाही का? केंद्राने अत्याचार केले तर बोलायचं नाही का? तुम्हाला राज्य सरकार यंत्रणा ,कोरोनाकडे लक्ष नाही सत्तेशिवाय बाहेर असणारे सतत सत्ता मिळवण्यासाठी सत्ता मिळेल असं स्वप्न बघतात. लसीबाबत केंद्राच्या हातात अधिकार आहेत. केंद्र वाटप करत आहे. फडणवीस म्हणतात यूपीला कमी लस दिली हे बरोबर नाही. गुजरातला इतकं लाडकं करण्याची गरज नाही त्याच्यावर अन्याय करा असं म्हणत नाही पण लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. 15 लाख लस उपलब्ध असती तर लसीकरण थांबलं नसतं. फडणवीस यांना सांगणं याबाबतीत थोडा विचार करा, लस जास्त मिळेल असं बघा, असंही जयंत पाटील म्हणाले.