बैठकीत स्थानिक पदाधिकारी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमित तिवारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर तिवारीला बाहेर काढण्यात आलं. काही वेळानं तिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह बैठकस्थळी दाखल झाला आणि तोडफोड करत बैठक उधळून लावली.
दरम्यान, अमित तिवारी विरोधात जातीवाचक शिविगाळ प्रकरणी अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबईत राष्ट्रवादीची ताकद आधीच कमी पडत असल्याचे महापालिका निवडणुकीतल्या निकालावरुन दिसून आले आहे. अशात मुंबईत एकजुटीने काम करण्याची पक्षाला नितांत गरज असताना, पक्षातच दोन गट पाहायला मिळत आहेत.
व्हिडीओ :