मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP) यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला करण्यात आला आहे. यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी (sachin kurmi) यांचा मृत्यू झाला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर काल(शुक्रवारी) धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी (sachin kurmi) यांच्यावर काल (शुक्रवारी) अज्ञाताने हल्ला केला. काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर रात्री अज्ञातानी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तालुकाध्यक्ष कूर्मी (sachin kurmi) यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिन कुर्मी भायखळा तालुकाध्यक्ष आहेत. रात्री हल्ला झाल्यानंतर तत्काळ कुर्मी (sachin kurmi) यांना जेजे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ कुर्मी यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. 


या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेमध्ये पडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीतून उपचारांसाठी जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं. 


सचिन कुर्मी (sachin kurmi) यांच्यावर कोणी आणि कोणत्या कारणासाठी हल्ला केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिवाय, या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अद्याप याप्रकरणी कोणतीही अटक झालेली नाही. तर कुर्मी हे समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे, आज समीर भुजबळ कुर्मी कुंटूबांची भेट घेणार आहेत.


समीर भुजबळ कुर्मी कुंटूबांची भेट घेणार


सचिन कुर्मी (sachin kurmi) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते, या घटनेची माहिती मिळताच ते मुंबईला रवाना झाले आहेत. ते आज कुर्मी कुंटूबांची भेट घेणार आहेत.