मुंबई : क्रूझ पार्टीमध्ये NCB ने अटक केलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला यांना एनसीबीने काय सोडलं? असा सवाल राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या तिघांना भाजप नेत्यांनी फोन केल्यानंतर सोडण्यात आलं का याचा खुलासा एनसीबीच्या समीर वानखेडे यांनी करावं असं आव्हान नवाब मलिक यांनी केलं आहे. आपण करत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


नवाब मलिक म्हणाले की, "एनसीबीने अटक केलेल्या तीन लोकांना भाजप नेत्यांच्या दबावामुळे सोडण्यात आलं का? समीर वानखेडे आणि दिल्लीतील तसेच राज्यातील भाजप नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची चौकशी करण्यात यावी. समीर वानखेडे तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावे. ही सर्व  छापेमारी बनावट आहे. या प्रकरणी केंद्राने एक समितीची स्थापना करावी आणि त्याची चौकशी करण्यात यावी." 


राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, "या क्रूझ पार्टीमध्ये एकूण 11 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये तिघांना सोडण्यात आलं. यामध्ये रिषभ सचदेव हा भाजप नेत्याचा मेहूणा आहे. त्याला सोडण्यासाठी एनसीबीला कुणाचा फोन आला होता हे समोर आलं पाहिजे. समीर वानखेडे आणि इतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांनी मागवून घ्यावेत. एनसीबी आणि भाजप नेते मुंबई आणि  बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी हे कुंभाड रचत आहेत.


आपण या आधीच्या आणि आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये जे प्रश्न उपस्थित केले आहे त्याची उत्तरं एनसीबीने द्यावीत असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे. 


संबंधित बातम्या :