मुंबई: लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकून हल्लेखोरांनी काही प्रवाशांना लुटलं आणि एका महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इगतपुरी-कसारा स्थानकादरम्यानची काल रात्री 8 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. आठ दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं आणि 20 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. 


मिळालेल्या माहितीनुसार  उत्तर प्रदेश मधून मुंबईत येत असणाऱ्या पुष्पक ट्रेनमध्ये दरोडेखोरांकडून लूट आणि एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुष्पक ट्रेन लखनऊवरून मुंबईच्या सीएसएमटीला येत होती. त्यामध्ये आठ दरोडेखोरांकडून लुट आणि एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. 


ट्रेन इगतपुरी ते कसारा दरम्यान आली तेव्हा हा प्रकार घडला.  हे सर्व आरोपी घोटी इगतपुरीमध्ये ट्रेन मध्ये चढले. या प्रकरणात कल्याण जीआरपीने गुन्हा नोंदवला असून 2 आरोपी ताब्यात घेतले आहे. तर इतर 6 आरोपी फरार आहेत. घटना इगतपुरी मध्ये घडली आहे.  या आठ जणांनी बोगी मधील एकूण सोळा जणांना लुटलं.  चार लोकांकडून रोख रक्कम लुटली तर 9 जणांचा मोबाईल हिसकावून घेतला. 


तसेच ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशमधून मुंबईत कामासाठी येत असणाऱ्या नवदाम्पत्यावर हल्ला करत 20 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेचा पती आणि एका प्रवाशाने जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण या आरोपीनी त्यांना जबर मारहाण केली. . या 8 आरोपींपैकी 7 इगतपुरीमध्ये राहणारे आहेत तर 1 मुंबईच्या मालवणी मध्ये राहणार होता. 


मुंबईमध्ये राहणार आरोपी व्यसन करत होता ज्यामुळे त्याला घरच्यांनी घराबाहेर काढलं आहे. तो घर सोडून घोटीमध्ये राहणाऱ्या इतर मित्रांसोबत राहत होता. हा गुन्हा नशेमध्ये केला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 6 आरोपी अजून ही फरार आहेत ज्यांचा शोध पोलीस करत आहेत.